देशात गॅरंटीचे दुसरे नाव म्हणजे मोदी; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून PM Narendra Modi यांचे कौतुक

148

देशतील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) जादू पाहिली. या विजयासाठी मोदी यांचे अभिनंदन. हा नौदलाचा कार्यक्रम आहे. परंतु, हा कालच मिळालेला विजय आहे, त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. कालच्या निकालातून एक गोष्ट देशातल्या नागरिकांनी सिद्ध केली की, देशात गॅरंटीचे दुसरे नाव म्हणजे मोदी, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले. भारतीय नौदलाच्या वतीने नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

जनता आणि त्यांची मनं जोडणारे पंतप्रधान (PM Narendra Modi)   महाराष्ट्रात आले आहेत. काल निवडणुकीच्या निकालात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi)  लाट पाहिली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाचं नाव मोठे केले आहे. जगभरात सन्मान वाढवला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट केली आहे. भारतीय आरमार उभारणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग येथे साजरा होत आहे. यासाठी नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली. सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो. शिवछत्रपतींनी पायदळ व घोडदळाप्रमाणे मराठ्यांचे आरमार सुसज्ज करत स्वराज्य बळकट केले. सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे अनेक जलदुर्ग उभारले. त्यांची उभारणी करताना शत्रूची जहाजे जलदुर्गाजवळ येण्यापूर्वीच क्षतिग्रस्त होतील, याची चोख व्यवस्था केली. जहाज बांधणीचे काम समांतरपणे हाती घेतले. गलबते, तोफा ठेवता येईल, असे गुराब त्यांच्या आरमाराचा भाग होते. सैनिकांची वाहतूक करण्यासाठी तरांडी तर माल वाहतुकीसाठी शिबाड जहाज वापरली गेल्याचे उल्लेख आहेत. सुमारे ४०० जहाजांच्या बळावर महाराजांनी कारवारपर्यंतचा कोकण किनारा आपल्या आधिपत्याखाली आणला, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा River Pollution : महाराष्ट्रातील सर्वाधिक नद्या आहेत प्रदूषित; मिठीसह कोणत्या नद्या बनल्यात धोकादायक?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.