Chandrasekhar Bawankule: बारामती लोकसभेचा विजय राज्यातील सर्वात मोठा विजय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकित

138

बारामती लोकसभा मतदारसंघातला विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते शुक्रवारी सांगलीत बोलत होते.

बारामती लोकसभेमध्ये अजित पवार देतील, त्या उमेदवाराला ६० टक्क्यांवर मतं मिळतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार )

मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला नाही, याविषयी ते म्हणाले की, राजीव गांधींनी १०० पैशात ८५ पैसे खाल्ले जायचे, असे मान्य केले होते. या भ्रष्टाचारामागे कोण होते, हे सर्वांना माहीत आहे, पण मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला नाही. जगातील अनेक नेत्यांनी मान्य केलं की, मोदी जगातील शक्तिशाली पंतप्रधान आहेत. जगातील १०३ देशाला कोविड लस देण्याचे काम केले, म्हणून मोदिंना ‘विश्व युगपुरुष’ म्हणतात. गरीब कल्याणचा अजेंडा नरेंद्र मोदींनी दिला. मोदी महिला सबलीकरणाच्या निर्णयामुळे १९२ महिला खासदार आणि ११० महिला आमदार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.