Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा – शरद पवार

नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा २४१० रूपये क्विंटलने खरेदी

111
Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा - शरद पवार
Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा - शरद पवार

केंद्र सरकारने निर्यात शुल्कावर ४० टक्के कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजारसमित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरला आहे. कांद्याचा भाव २००० ते २४०० च्या दरम्यान आला आहे. केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा. २४१० रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही. त्यामुळे कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसचे नेते कुरेशी म्हणतात मुसलमानांनी बांगड्या भरल्या नाहीत, १-२ कोटी मुसलमान मेले तरी चालतील…)

केंद्र सरकार नाफेडमार्फत २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. २४१० रुपये प्रतिक्विंटल दरानेही कांदा खरेदी केली जाणार आहे. नाफेडमार्फत दिला गेलेला आत्तापर्यंतचा हा विक्रमी भाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. निर्यात शुल्कामुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जपानहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर हा तोडगा निघाला. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्राने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली, पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.