Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर वाढले; पेट्रोल-डिझेलवरही होईल का परिणाम ?

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

81
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर वाढले; पेट्रोल-डिझेलवरही होईल का परिणाम ?
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर वाढले; पेट्रोल-डिझेलवरही होईल का परिणाम ?

सौदी अरेबिया आणि रशियाकडून कच्च्या तेलाचा आवश्यक तितका पुरवठा केला जात नाही. जास्त व्याजदराचाही किंमत वाढण्यावर परिणाम होत आहे. सोमवारी क्रूड ऑईलच्या किंमतीत पुन्हा एकदा किंचित वाढ झाली. भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ६ एप्रिल २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत ८० पैशांनी शेवटची वाढ झाली होती. २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाची मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे. मात्र आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

(हेही वाचा – Kalwa Hospital : कळवा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती)

सलग ७ आठवडे क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ

गेल्या आठवड्यात चीनमुळे बाजार सुमारे २ टक्क्यांनी घसरला होता. त्याआधी सलग ७ आठवडे क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाली होती. सोमवारी बाजार बंद होताना बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 64.46 डॉलरवर बंद झाला. क्रूड ऑईल देखील प्रति बॅरल 80.72 डॉलरवर बंद झाले.

देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले असून आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिरच आहेत. देशात एक वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी २२ मे २०२२ रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.