महाराष्ट्राच्या ‘या’ आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल!

59
आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. हा आमदार धस यांच्यासाठी दणका आहे.

कोणती कलमे लावली? 

आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम 395 वाढवण्याच्या आदेशाने धस अडचणीत आले आहेत. धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी 143, 147, 148, 149, 427, 336 आणि 379 ही कलमे लावली होती. त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. माधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे लावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.