शिवसेनेच्या ट्वीटर अकाऊंटचे नाव बदलताच Blue Tick गायब; चर्चांना उधाण

127

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यातच सत्तासंघर्षाच्या अनेक मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरुच आहे. असे असतानाच आता ठाकरेंना पुन्हा एक धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण वापरण्यास ठाकरे गटाला मज्जाव केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्या ट्वीटर हॅंडलचे नाव बदलण्यात आले. शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या घडामोडींबाबत अपडेट देणा-या शिवसेना या अधिकृत ट्विटर हॅंडलचे नाव आता शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे करण्यात आले आहे. त्यामुळे ट्वीटरवरुन पक्षाचे Blue Tick गायब झाले आहे. तर शिवसेनेची वेबसाईटही बंद झाली आहे.

का गेले Blue Tick?

ट्वीटरच्या नियमांनुसार कोणतेही हॅंडल अधिकृत आहे की नाही हे तपासले जाते व त्यानंतर त्याला ब्लू टिक देण्यात येते. एकदा ब्लू टिक मिळाल्यानंतर काही बदल खातेदाराला कधीही करता येतात. त्याचा ब्लू टिकवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, अधिकृत झालेल्या आणि ब्लू टिक मिळालेल्या खात्याचे हॅंडल नाव बदलले तर ट्वीटर संबंधित खात्याचे ब्लू टिक काढते. त्यामुळे पुन्हा ब्लू टिक मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.

( हेही वाचा: पुढच्या वर्षी कोणाचीही अडवणूक होणार नाही; योग्य पद्धतीने नियोजन होईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.