भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा अनोखा विक्रम; सचिन तेंडूलकरलाही टाकले मागे

136

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळवला जात आहे. रविवारी सामन्याचा तिसरा दिवस असून, हे कसोटी मालिकेचे दुसरे सत्र आहे. भारताला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाने 4 विकेट्स गमावत 118 धावा बनवल्या आणि दमदार विजय आपल्या नावे केला. परंतु, याचदरम्यान भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने मात्र अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या विक्रमानंतर त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. विराट कोहली याने 25 हजार धावा बनवल्या आहेत. 25 हजार धावा बनवणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली सारखे दिग्गजदेखील त्यांच्या संपूर्ण कामगिरीत हा विक्रम करु शकले नाहीत.

( हेही वाचा: ३१ मार्चपासून सुरू होणार IPL! पहिला सामना कोणत्या टीम खेळणार? १६ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक पहा एका क्लिकवर )

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. आतापर्यंत हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. मात्र, विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकत जगातील सहावा सक्रिय फलदांज ठरला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.