पुढच्या वर्षी कोणाचीही अडवणूक होणार नाही; योग्य पद्धतीने नियोजन होईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

121

VIP लोकांसाठी शिवभक्तांची अडवणूक का केली जाते? असा प्रश्न संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर केला. त्यानंतर त्यांच्या या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर येण्यापासून कोणाचीही अडवणूक करणार नाही, असे आश्वासन दिले. शिवरायांना वंदन केल्यानंतर किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अडवणूक केल्याने शिवप्रेमी नाराज

शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा देशभर साजरा होत आहे. मात्र, सोहळ्यात शिवप्रेमींना प्रवेश नाकारल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. व्हीआयपी पासेस देऊन शिवनेरीवर सोडण्यात येत होते. हा प्रकार पाहून माजी खासदार संभाजी छत्रपती प्रचंड संतापले. हा दुजाभाव कशासाठी? सर्वांनाच प्रवेश दिला पाहिजे. शिवनेरीवर दुजाभाव होता कामा नये. जोपर्यंत शिवप्रेमींना शिवनेरीवर सोडले जात नाही. तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा आक्रमक पवित्राच संभाजीराजे यांनी घेतला. त्यामुळे शिवनेरीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्र्यांनी पुढल्या वर्षी योग्य नियोजन करु असे सांगितले.

( हेही वाचा: पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी 2 हजार कोटींची डील; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप )

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवराय होते म्हणूनच आपण स्वातंत्र्य पाहत आहोत. मानाने जगतो आहोत, म्हणून आपल्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण दरवर्षी शिवनेरीवर येत असतो. शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या सुचनांनुसार पुढील वर्षीपासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन केले जाईल. पुढील वर्षी शिवनेरीवर कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही.

गडकिल्ल्यांसाठी राखीव निधी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याच्या विकासनिधीमध्ये आता गडकिल्ल्यांकरता निधी राखून ठेवला जात होता. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या संरक्षणाकरता दरवर्षी निधी उपलब्ध होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन आम्ही महाराजांची विचार स्मारके जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.