भाजपा आक्रमक: किरीट सोमय्या हल्लयाच्या निषेधार्थ भाजप आंदोलन करणार

97

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर, आता भाजप आक्रमक झाली आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांनी सुचेल तसे या लढाईसाठी आंदोलन करावे. आता लढाई ही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

तर भाजप शांत बसणार नाही

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला. पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला आहे. पश्चिम बंगाल ,केरळसारखी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे का? राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू दिले नाही. राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. दिवसभर त्यांच्या घराबाहेर तमाशा आणि हैदोस घालणा-यांना पोलीस अटक करणार नाही का? पोलीस तमाशा बघणार का? कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करणारेही पकडले नाहीत. असे होणार असेल तर भाजप आणि सामान्य माणूस शांत बसणार नाही असे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: अमरावतीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर पसार )

ट्वीटमध्ये काय म्हणाले चंद्रकांत पाटील

“झेड” सिक्युरिटी असलेले किरीट सोमय्या यांच्यासारखा सारखा नेता,पोलीस ठाण्याच्या आवारातच भीषण दगडफेकीत रक्तबंबाळ होतो. हेच खरे अराजक. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळेच गुंड प्रवृत्तीचे शिवसैनिक मोकाट उधळले आहेत. महाराष्ट्राचा बंगाल झाला, याचा आणखी काय पुरावा हवा आहे ? असे चंद्रकांत पाटलांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.