आमदार गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट! जयंत पाटलांवर आरोप

72

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडिओ आटपाडी पोलिस ठाण्याच्या दारातला असून तिथे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित होता. गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केले आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनी पोलिस संरक्षण नाकारले

पोलिस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्याने बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचे जर भक्षकात सामील झाले असतील, तर विश्वास कुणावरती ठेवायचा, असा सवाल तो हल्ला आटपाटी पोलिस ठाण्याच्या दारात झाला आहे. माझी गाडी ज्या दिशेने येत होती, त्याच्या विरोधी बाजूला 200 ते 300 लोक उभे राहिले होते. पोलीस बघत होते, शुटिंग करत होते. मी थांबलो की माझा खून करण्याचा प्लॅन होता, असा धक्कादायक आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पोलिस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यामुळे मी बॉडीगार्ड नाकारल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. हे सर्व प्रकरण सागंली जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान घडले होते. सोलापूरमध्येही हल्ला झाला होता त्यावेळी अमोल मिटकरी यांनी तेच उत्तर दिले होते. आता ज्यावेळी हल्ला तो आटपाडी पोलिस ठाण्याचा होता, त्यामुळे यातील सत्य लोकांना माहिती आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

(हेही वाचा काँग्रेसच्या चुकीमुळे काश्मीर प्रश्न आजवर सुटला नाही…)

हत्येचा कट पोलिस संरक्षणात

आपली गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचे स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचे चित्रीकरण पोलिस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलिस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलिस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.