काँग्रेसच्या चुकीमुळे काश्मीर प्रश्न आजवर सुटला नाही…

78

स्वातंत्र्योत्तर काळात काश्मीर प्रश्न सोडवता आला असता, परंतु काँग्रेसला हा प्रश्न सोडवायचा नव्हता. काँग्रेसच्या चुकीमुळे काश्मीर प्रश्न सुटला नाही. या चुकीने देशावर आर्थिक बोझा वाढतच जात आहे. काश्मिर प्रश्न सुटला असता, तर आज देशात सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असते, असा आरोप भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी डोंबिवली येथे केला आहे.

प्रयत्नच केले नाहीत

स्वर्गीय अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी स्व.अटलबिहारी बाजपेयी यांच्या राजकीय तसेच सामाजिक जीवनावर प्रकाश टाकताना त्याकाळात विरोधी पक्षातील एकही नेता त्यांच्यावर टीका करत नव्हता, कारण ती महान व्यक्ती होती. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर दौरा करण्यामागे देशाच्या हिताचा उद्देश होता ,असे सांगताना कांबळे यांनी काँग्रेसने काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याचे सांगितले.

 ( हेही वाचा: भारतरत्न वाजपेयींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन राजकीय वातावरण तापले )

सर्वांपर्यंत विचार पोहोचवा

कांबळे यांनी आपल्या भाषणात कोरोना काळात राहुल गांधी पंतप्रधान असते, तर विचार करा देशाचे काय झाले असते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दूरदृष्टीने  कोरोना संकटात देशाला सावरले. आज आपल्या देशाला चांगल्या विचारांची गरज आहे, म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी भाजपचे विचार सर्वांपर्यत पोहोचवणे आवश्यक असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

बिलात सूट दिली जाणार

यावेळी ग्रामीण मंडल अध्यक्ष परब म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीने आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने वैद्यकीय सेवा आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ठाकूर रुग्णालय आणि एम्स रुग्णालय यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्य संदर्भात या रुग्णालयाशी संपर्क केल्यास येणाऱ्या बिलात १० ते १५ टक्के सूट दिली जाईल. तसेच 950 ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुविधाबाबत भाजपच्यावतीने पत्रके देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देसाई म्हणाले, ज्याप्रमाणे भाजप ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे युवा मोर्चाने देशाच्या हितासाठी भाजपचे विचार युवकांपर्यत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.