Money Laundering: राऊतांचे आरोप राहुल कुल यांनी फेटाळले; म्हणाले, राजकीय आकसापोटी…

155

सरसेनापती संताजी घोरपेड साखर कारखान्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. रविवारी त्यांनी यांची ट्वीटवरून कल्पना दिली होती. त्यानुसार संजय राऊतांनी सोमवारी पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. मध्येही गैरव्यवहार होत असल्याचा दावा करत, या कारखान्यात आमदार राहुल कुल यांनी ५०० कोटींचा मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधित राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्तांना पत्र दिले आहे. मात्र हे सर्व आरोप राहुल कुल यांनी फेटाळून स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमांसोबत बोलताना राहुल कुल म्हणाले की, ‘मी गेल्या २२ वर्षांपासून भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तिकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच कधीही कारखाना खासगी होऊ नये याच्यासाठीही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना राजकारणात अशा प्रकारचे आरोप होणे अपेक्षित आहे. याच्या मागे राजकारण व्यतिरिक्त काहीच दिसत नाही.’

पुढे राहुल कुल म्हणाले की, ‘संजय राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले आहेत. राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीने राऊतांनी हे आरोप केले आहेत.’

दरम्यान दौंड येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकार समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावली होती.

(हेही वाचा – प्रकाश सुर्वे-शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओवरून सभागृहात गदारोळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.