Bhalchandra Nemade : भालचंद्र नेमाडेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार दाखल

117

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. औरंगजेबच्या दोन हिंदू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंडे यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भ्रष्ट केलं होतं. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे भाजपने नेमाडेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली.

भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार विभागाने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे. महाराष्ट्र भाजपाचे सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड. अशुतोष दुबे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अॅड. दुबे ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘भालचंद्र नेमाडे या लेखकाविरोधात मी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमाडे यांनी हिंदू ब्राह्मणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणी हस्तक्षेप करणारं आणि जनतेला चिथावणी देणारं भाषण केलं आहे. या विधानातून त्यांनी सार्वजनिक सलोखा बिघडवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत योग्य ती कारवाई करावी.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.