उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती; नितेश राणेंचा गंभीर आरोप

89

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली नाही. याच मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण तापले असताना, त्यातच आता नितेश राणेंनी गंभीर आरोप केला आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी माझे वडील नारायण राणे यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. आता महाराष्ट्राच्या जनतेकडून सहानुभूती घेणारे उद्धव ठाकरे आहेत तरी कसे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावे, म्हणूनच हे ट्वीट केल्याचे नितेश राणेंनी म्हटले आहे.

( हेही वाचा: जयंत पाटील यांना न्यायालयाचे वाॅरंट; जाणून घ्या काय आहे प्रकरण )

असे आहे ट्वीट 

“माझे वडिल नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक सुपा-या देण्यात आल्या. तथाकथित शांत आणि सभ्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडून सुपारी देण्यात आली. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु”, असे ट्वीट नितेश राणेंकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.