“तुमचं हिंदुत्व खोटं! उद्धव ठाकरे हे डरपोक”, सोमय्यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

110

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांसह भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत तर उद्धव ठाकरे नकली आहेत असे म्हटले इतकेच नाही तर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला.

काय म्हणाले सोमय्या…

यावेळी सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नाही. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या १८ जणांची चौकशी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु आहे. अनिल परबांचे सचिन वाझे बजरंग खरमाटे यांच्यावर कारवाई सुरु आहे. भावना गवळीवर चार समन्स आहेत. अनिल देशमुख चार महिने जेलमध्ये आहेत, अशी टीका देखील किरीट सोमय्यांनी केली.

(हेही वाचा – मुंबईचा लचका तोडण्याचा भाजपाचा मनसुबा! उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल)

ठाकरेंनी महाराष्ट्राला असली नकली शिकवू नये

तसेच ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे तुमचे हिंदुत्व नकली आहे. अजाण बंद झाल्याने उद्धव ठाकरे यांची बोबडी बंद झाली आहे. शिवसेनेचं हिंदुत्व नकली आहे, हे जनतेला कळले आहे. सोमय्यांनी अलिबाग येथील कोरलई गावातील बंगल्यांवरुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. असली क्या है नकली क्या है, हे जनतेला समजले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला असली नकली शिकवू नये, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.