सरकार चालवताय कि दाऊदची गँग? आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई पोलिस देशमुख प्रकरणाची कागदपत्रे देत नाहीत, आमच्या अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असा आरोप सीबीआयने गुरुवारी, ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली.

88

अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय “द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?, असा घणाघाती हल्ला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे ठाकरे सरकारवर केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबतच सरकारकडून सहकार्य केले जात नाही. उलट सहाय्यक पोलिस आयुक्ताकडून आमच्या अधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप सीबीआयने गुरुवारी, ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली. न्यायालयानेही त्याची दखल घेत राज्य सरकारला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता भाजपही आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकामागोमाग तीन ट्विट करत राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला.

(हेही वाचा : सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजपचा ‘लोकल’ प्रवास!)

सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असे शेलार यांनी म्हटले आहे.

राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलिस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. न्यायालयाचे आदेशही मानत नाही.

देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी सरकारवर चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका

दरम्यान, गुरुवारीच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या खार येथील कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यावरून शेलार यांनी ही इमारत तीन महिन्यांपूर्वीच वापरात काढली असताना ‘करून दाखवले’च्या नादात मुख्यमंत्र्याच्या हातून या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. या इमारतीच्या उभारणीत शिवसेनेचा काहीही सहभाग नव्हता, केवळ श्रेय लाटण्यासाठी हा खटाटोप केला, अशी टीका शेलार यांनी केली होती. आता शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.