BJP : बिहार निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; पक्षात खांदेपालट होणार ?

134
'पळपुटे विरोधक' ते 'भ्रष्ट इंडिया कंपनी'; BJP चा राहुल गांधी आणि संजय राऊतांवर घणाघात
  • प्रतिनिधी

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीपासून राज्यापर्यंत राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे, भाजपामध्ये मोठा संघटनात्मक भूचाल घडत आहे का ? येत्या आठवड्यात पक्षाच्या रचना आणि नेतृत्वात मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. (BJP)

(हेही वाचा – 20 वर्षे मुख्यमंत्री… पण कधीच निवडणूक नाही! Nitish Kumar यांचा हा ‘गेमप्लॅन’ नेमका काय?)

या घडामोडींनी पक्षाच्या केंद्र आणि राज्य संघटना या दोन्ही स्तरांवर नव्या समीकरणांची चाहूल लागू लागली आहे. काही महत्त्वाच्या पदांवर खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या सर्वात वरच्या पातळीवरही बदलांचे वारे वाहू लागल्याची चर्चा असून “भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार का ?” हा प्रश्न राजकीय विश्लेषकांना गुंतवून ठेवतोय. (BJP)

(हेही वाचा – Bihar मध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू)

राज्यात देखील नव्या प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेची शक्यता अधिकच मजबूत होत आहे. बदलांची मालिका केवळ औपचारिक नसून, येत्या काळातील पक्षाची रणनीती, विस्तार आणि निवडणूक तयारी यावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व बदल कोणाच्या दिशेने सूचित करतात ? पक्षाची पुढील चाल काय असेल ? याबाबत पक्षांतर्गत हालचाल वेगाने वाढताना दिसते. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.