Uddhav Thackeray : चिपळूणमधील सभेच्या भाषणावरुन उद्धव ठाकरेंवर भाजपाचा हल्लाबोल

247

चिपळूणमध्ये उबाठाची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जे भाषण केले, त्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका केली. याविषयीची पोस्ट सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.

या वेळी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोर म्हणतो, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. त्यावर भाजप मुंबईने एस्कवर कडाडून टिका केली आहे. जय श्रीराम म्हणणा-यांना हरोमखोर म्हणणे, उद्धव ठाकरे हा हिंदू द्वेष नाही, तर काय?, अशी पोस्ट भाजप मुंबईने सोशल मीडियात पोस्ट केली.

(हेही वाचा Paytm Crisis : पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये माझा पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा घेतला. माझ्या सह्या घेतल्या. माझा पाठिंबा घेताना यांना मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. हे त्यांचे ढोंग आणि हरामखोरपणा आहे. ते जयश्री राम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.