Veer Savarkar : लता मंगेशकर वीर सावरकरांसोबत राजकारणात काम करणार होत्या पण…; दीदींच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिनेता रणदीप हुडा यांनी केली पोस्ट 

238
गाणसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी होती. यानिमित्ताने ‘वीर सावरकर’ या चित्रपटात वीर सावरकर (Veer Savarkar) यांची भूमिका केलेले अभिनेते रणदीप हुडा यांनी पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्यांनी लतादीदी या वीर सावरकर यांच्या विचारांवर कशा प्रभावित झाल्या होत्या, याविषयीची माहिती दिली आहे. लता दीदींनी त्यांच्या ट्वीटरवर २६ फेब्रुवारी २०१४ रोजी पोस्ट केली होती, त्यात त्यांनी वीर सावरकर  (Veer Savarkar) यांच्यासोबत काढलेले छायाचित्र टाकले होते. दीदींची ती पोस्टही हुडा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये घेतली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन. वीर सावरकर  (Veer Savarkar) यांना अनेक दशके प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात आहे. लता दीदी यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आॅल इंडिया रेडिओवर वीर सावरकर यांची कविता गायली, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. असे केल्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना माहीत होते. लता दीदींचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या आग्रहाखातर ब्रिटिशांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी वीर सावरकर  (Veer Savarkar) यांनी नाटक लिहिले. वीर सावरकर यांनी हिंदी आणि मराठी भाषेत अनेक नवे शब्द निर्माण केले. ज्यांचा आजही वापर केला जात आहे. लता दीदी यांना वीर सावरकर यांच्यासोबत राजकारणात काम करण्याची इच्छा होती. परंतू वीर सावरकर यांनी त्यांना गायन करावे, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी पुढे त्यांच्या बंधूंनी संगीत दिग्दर्शित केलेली गाणी गायली. वीर सावरकर यांनी देशासाठी खूप त्याग केला आहे. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांचा अपेक्षित सन्मान झाला नाही. वीर सावरकर  (Veer Savarkar) आणि लता दीदी या दोन महान विभूतींना अभिवादन, असे रणदीप हुडा यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.