Narendra Modi: कॉंग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात, पंतप्रधान मोदींचं राज्यसभेतून थेट आव्हान

ज्या गोष्टी देशात घडत आहेत, ते जनतेला समजले पाहिजे. कॉंग्रेस पक्ष विचारांनीही कालबाह्य झालेला आहे.

131
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी कॉंग्रेसने केंद्र सरकारकवर केलेल्या टीकेचा सडेतोड शब्दात समाचार घेतला. यावेळी कॉंग्रेसला टोला लगावताना मोदी म्हणाले की, कॉंग्रेसने केवळ आपल्या ४० जागा वाचवून दाखवाव्यात.मी केवळ प्रार्थना करू शकतो.पश्चिम बंगालमधून आव्हान देण्यात आले आहे की, यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस ४० जागाही जिंकू शकणार नाही, मात्र मी प्रार्थना करतो की, कॉंग्रेसने (Congress party) आपल्या ४० जागा तरी वाचवाव्यात, असा उपरोधिक टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.

ज्या गोष्टी देशात घडत आहेत, ते जनतेला समजले पाहिजे. कॉंग्रेस पक्ष (Congress party) विचारांनीही कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे कामकाजही आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. इतकी दशके देशावर राज्य करणारा पक्ष याचे पतन झाले आहे. याचा आम्हाला कदापि आनंद नाही. कॉंग्रेस पक्षासोबत आमच्या संवेदना आहेत, अशी खरखरीत टीकाही त्यांनी केली आहे. यावेळी इतकी वर्ष देशावर राज्य केलेल्या मोठ्या पक्षाचे अशा प्रकारे पतन झाले, याबाबत आमच्या संवेदना आहे, असा टोलाही मोदींनी लगावला.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : चिपळूणमधील सभेच्या भाषणावरुन उद्धव ठाकरेंवर भाजपाचा हल्लाबोल )

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही…
पंतप्रधानांचा (Narendra Modi) आवाज दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. पूर्ण संयमाने आणि धैर्याने आम्ही तुमचे म्हणणे शांतपणे ऐकले, मात्र माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. देशातील जनतेने या आवाजाला ताकद दिली आहे. देशातील जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे हा आवाज बुलंद होत आहे. संसदेत तुम्ही आला आहात, मला वाटले की, सर्व मर्यादांचे पालन कराल, मात्र तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्यात. मीही तयारीनिशी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कॉंग्रेसवर केलेल्या टीकेचा पलटवार…
कॉंग्रेस पक्षाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे एका रात्रीत बरखास्त केली. कॉंग्रेसने देशाला तोडण्याचे काम केले. ऐकण्याची क्षमता गमावली. हाच कॉंग्रेस पक्ष लोकशाहीवर प्रवचन देत आहे, या शब्दांत मोदी यांनी कॉंग्रेसवर केलेल्या टीकेला पलटवार केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.