Bachhu Kadu : सरकारच्या डोक्यात भूसा भरला आहे का? – बच्चू कडू

151

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदार संघातील आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा करी असताना शिंदे सरकारला घरचा अहेर दिला. भूमिहीन मजूर तसेच धनगर समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सरकारच्या डोक्यात भुसा भरला आहे का? असा संतप्त सवाल केला. तसेच १.३६ लाख रुपयात कुणी घर बांधून दिले तर आपण दाढी-मिशी काढून टाकू, असे आव्हान सरकारला दिले.

खुर्चीची किंमतच २-३ लाख..

कडू यांनी विधानसभेत बोलताना सरकारवर टीका करीत सांगितले की, “सरकार धनगर समाजाला एक लाख घरे देणार आहे. यात १.३६ लाख रुपयाला घर देणार असल्याचे सांगण्यात आले. इतक्या कमी किमतीत (low cost) एक भिंत तरी बांधून होते का हो?” असा प्रश्न केला. पुढे बोलताना पिठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीची किंमतच दोन ते तीन लाख रुपये असेल असे सांगून “सरकारच्या डोक्यात भुसा भरला आहे का?” असा सवाल केला.

(हेही वाचा Lalit Patilचा पहिला ड्रग्जचा कारखाना सापडला; पण चौकशी झालीच नाही; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)

तर दाढी-मिशी काढेन..

कडू (Bachhu Kadu) यांनी एकनाथ शिंदे सरकाराला पाठिंबा दर्शवला असून शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर कडूदेखील गुवाहाटीला (Guwahati) गेले होते. तेव्हापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या कडू यांनी सरकारवर तोंडसुख घेतले. “सव्वालाखात घर बांधणाऱ्या सरकारचे डोके थाऱ्यावर आहे की नाही,” असा असा प्रश्न करीत “मंत्रीमहोदय आणि सत्ताधारी पक्षाचे इतर सदस्य यावर का नाही बोलत,” असा सवालही केला. “हे बदलायला हवे,” असे सांगून “१.३६ लाख रुपयात कोणी घर बांधून दिले तर मी दाढी-मिशी काढून टाकेल,” असे आव्हानही कडू यांनी दिले.

सभागृहाच्या भिंतींना तडे गेले, सरकारला कळत नाही..

ते पुढे म्हणाले, “शहरातील लोकांना अडीच लाखाचे घर आणि ग्रामीण भागातील जनतेला सव्वा लाखाची घर, ही तफावत का? तसेच “शेतकरी आणि शेतमजुरांची मते या सरकारला नको आहेत का,” असा थेट सवाल केला. “इथे कितीतरी वेळा हा विषय मांडला. या गोष्टी सरकारच्या डोक्यात का आणि कधी जातील हे कळत नाही. हा विषय ऐकून या सभागृहाच्या भिंतींना तडे गेले मात्र सरकारला हा विषय समजत नाही,”असे संतप्त मत त्यांनी व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.