Pimpri-Chinchwad zoo : पिंपरी-चिंचवड प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे.

116
MLA Disqualification Case : अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
MLA Disqualification Case : अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. हे प्राणीसंग्रहालय महापालिकेकडे न ठेवता महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या जातील, असेही शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. (Pimpri-Chinchwad zoo)

मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहाल सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबर या प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूबाबतही सरकारला जाब विचारला होता. याप्रश्नाच्या चर्चेवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. (Pimpri-Chinchwad zoo)

२०१७ ते सन २०२३ या कालावधीत ‘इतक्या’ प्राणांचा मृत्यू

या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक आणि हवामान बदलामुळे झाला असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून सेंट्रल झू प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे. त्यांनी देखील त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. परंतु, ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. (Pimpri-Chinchwad zoo)

(हेही वाचा – Old Pension Scheme : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी ‘सामूहिक रजा’ आंदोलन)

रचनात्मक बदल करण्यासाठी ‘इतक्या’ कोटींची निविदा 

दरम्यान, या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. यामध्ये रचनात्मक बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने १९ कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात आली आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत नाना पटोले, योगेश सागर यांनी सहभाग घेतला. पटोले यांनी यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेला लक्ष्य केले. ही महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे केंद्र असून या महापालिकेत आयुक्त मोठी भूमिका बजावत आहेत, असा आरोप त्यांनी केला. (Pimpri-Chinchwad zoo)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.