Azan : कांदिवलीत शाळेत अजान वाजवले; वादाला तोंड फुटले 

अजान वाजविणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे.

113

मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये असलेल्या एका शाळेत सकाळच्या सत्रात अजान वाजल्यानंतर, नवा वाद सुरू झाला आहे. या घटनंतर, भाजप आमदार योगेश सागर यांनी यासाठी जबाबदार असलेल्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर, कपोल इंटरनॅशनल स्कूलबाहेर शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शनेही केली.

शाळा सुरु होऊन नुकतेच दोन दिवस झाले आहेत. असे असतानाच, आता शाळेतील अजानच्या मुद्द्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. याबाबत शिवसेनेने शाळेला खुलासा मागितला आहे. अजाननंतर शाळेबाहेर मोठा गोंधळ झाल्याने खबरदारी म्हणून शाळेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यासंदर्भात शाळेत पोहोचलेले भाजप आमदार योगेश सागर यांनी रेकॉर्डिंग चलाविणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या अजानसंदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्या घरी सांगितले. यानंतर, विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात एत्र येऊन घोषणाबाजी केली.याच बरोबर शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गोन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अजान वाजविणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे. आपल्या निवेदनात शाळेने म्हटले आहे की, आम्ही शाळेत लाउडस्पीकरवर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना वाजवतो, शाळेच्या वतीने हा उपक्रम विद्यार्थ्यांना गायत्री मंत्र, कॅरोल गायन अथवा इतर धार्मिक प्रार्थना समजाव्यात म्हणून राबविला जातो. याचाच एक भाग म्हणून आज लाउडस्पीकरवर अजान वाजविण्यात आली. मात्र पालकांच्या भावना पाहून आम्ही अजान बंद केली. आम्ही विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे ऐकत आहोत. याच वेळी शाळेकडून, आता शाळेत अजान न वाजविण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

(हेही वाचा Hindu Rashtra : हिंदूंनो, ‘हलाल’सारख्या इस्लामी आर्थिक आक्रमणाला बहिष्काराने प्रत्युत्तर द्यावे;  रणजित सावरकरांचे आवाहन )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.