अविष्कार भुसे ‘भावी खासदार’; उद्धव ठाकरेंची सभा अन् मालेगावमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी

68

शिवसेनेचे मंत्री दादा भूसेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. परंतु दुसरीकडे मालेगावमध्येच मुंबई-आग्रा महामार्गावर दादा भूसेंचे सुपुत्र अविष्कार भुसे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करत पोस्टर लावण्यात आले आहेत.

( हेही वाचा : या गावाला रस्तेच नाहीत, फक्त पाणीच पाणी )

भावी खासदार म्हणून महामार्गावर पोस्टर 

उद्धव ठाकरे यांच्या मालेगावमधील सभेसाठी ठाकरे गटाकडून तयारी करण्यात येत आहे. संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून सकाळी त्यांनी सभा स्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव हा मतदारसंघ आहे, मालेगाव शहरामध्ये अविष्कार भुसे यांचे भावी खासदार अशा नावाचे पोस्टर लावण्यात आले आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

पालकमंत्री भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांची भावी खासदार म्हणून झळकणाऱ्या पोस्टरची मालेगाव शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा आहे. मालेगाव शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर भावी खासदार अशा आशयाचे पोस्टर लागलेले आहेत. अविष्कार भुसेंसह दादा भुसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो या बॅनरवर दिसून येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.