Assembly Election 2023 Result : आज कळले ना मर्द कोण; भाजपच्या आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर निशाणा

Assembly Election 2023 Result : भाजपच्या या विजयावर एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे.

192
Assembly Election 2023 Result : आज कळले ना मर्द कोण; भाजपच्या आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर निशाणा
Assembly Election 2023 Result : आज कळले ना मर्द कोण; भाजपच्या आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर निशाणा

महाराष्ट्राच्या गल्लीत उभे राहून रोज एक नेता सांगत असतो, होय मी मर्द आहे..!पण आज कळलं का? मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती! अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

(हेही वाचा – MP Assembly Election 2023 : काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला; काय आहेत शिवराज सिंह यांच्या यशाची कारणे)

खासदार संजय राऊत यांना टोला

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि तेलंगणा (Telangana) या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळविले. भाजपच्या या विजयावर एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलाच टोला लगावला आहे.

पनौती कोण आणि चुनौती कोण!

त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात, “देशाला पुरुष हवाय!” ”अरे तुम्हाला मिडियाचे चार कॅमेरे सोडले तर या देशात विचारते कोण?”, असा सवाल शेलार यांनी संजय राऊत यांना उद्देशून केला आहे. ”आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना पण दाखवून दिलेय “पनौती कोण आणि चुनौती कोण!” असे शेलार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील पंचायत ते राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विधानसभा आणि लवकरच होणाऱ्या पार्लमेंटमध्ये फक्त मोदी, मोदी आणि मोदी (Narendra Modi)!!, असेही शेलार यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे. (Assembly Election 2023 Result)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.