Ashish Shelar : युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलार यांचा आरोप

176
Ashish Shelar : युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलार यांचा आरोप
Ashish Shelar : युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलार यांचा आरोप

ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने २५ वर्षे मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं मिळत नसल्यामुळे थयथयाट सुरू आहेच. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला असून मोर्चाला नाव मुंबईकरांचे आणि चर्चा कंत्राटांची अशी, टीका केली आहे.

शेलार म्हणाले, उबाठा गटाच्या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये मुंबईकरांची काळजी कुठे होती? यालाच कंत्राट का? म्हणजे याचा अर्थ यांच्या कंत्राटदारांना का नाही? हा काय मुंबईकरांसाठी विचारलेला प्रश्न नव्हता. एवढे रस्ते कशाला? एवढी स्ट्रीट फर्निचरची खरेदी कशाला? म्हणजे मुंबईकरांसाठी फर्निचर खरेदी केली ती यांच्या कंत्राटदारांकडून का नाही असेच ना? हे काही मुंबईकरांचे प्रश्न नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच)

स्ट्रीट फनिर्चरच्या खरेदीची चर्चा करताय? मग ईडी मध्ये समोर आलाले युसूस फनिर्चरवाल्याच्या फ्लॅट मध्ये कोविड काळात देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याची जी माहिती उघड होतेय, यावर का बोलत नाहीत? मुंबईच्या रस्त्यांची कामे आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करणारे कंपन्या करतात, चांगल्या दर्जाचे रस्ते, विस वर्षांची हमी घेऊन केली जात आहेत. रस्त्यांची कामे करताना युटिलिटी डक तयार केले जात आहेत. याकडे दुर्लक्ष करून सगळी चर्चा कंत्राटदारांची आजच्या मोर्चात पहायला मिळाली, असेही शेलार म्हणाले.

कोरोनात बिल्डरला खैराती वाटल्या

कोविड काळात मुंबईच्या बिल्डरांना ५० टक्के प्रिमियम मध्ये सूट देण्याची खैरात केलीत, त्यामुळे मुंबई महापालिकेचे १२ हजार कोटींचे नुकसान झाले, ताज हॉटेलला सुट दिलीत ही पालिकेच्या तिजोरीची लूट नाही का? तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही “चोर मचाज शोर” हे जे तुम्हाला म्हणतोय तेच मुंबईकरांना पटेल, अशा शब्दात आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.