व्हाट्सअ‍ॅपने आणले नवीन फिचर; आता सहज करता येणार डाटा ट्रान्स्फर

259
व्हाट्सअ‍ॅपने आणले नवीन फिचर; आता सहज करता येणार डाटा ट्रान्स्फर

जगभरात व्हाट्सअ‍ॅप चे करोडो वापरकर्ते आहेत. सोशल मिडीयाच्या युगात आपले स्थान टिकवण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप कंपनी नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. असेच एक नवीन फीचर व्हाट्सअ‍ॅपने पुन्हा आणले आहे. या फिचरमुळे तुम्ही तुमचे चॅट्स अगदी सहजपणे आणि सुरक्षितरित्या ट्रान्सफर करू शकता.

क्यूआर कोडने करा व्हाट्सअ‍ॅपचे चॅट ट्रान्सफर

मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हाट्सअ‍ॅपचे नवीन फिचर लाँच केले आहे. मेटाने व्हाट्सअ‍ॅप चॅट दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग शोधला आहे. व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते आता ॲपमधून बाहेर न पडता त्यांचा संपूर्ण चॅट आणि मीडिया दुसऱ्या डिव्हाइसमध्ये क्यूआर कोडद्वारे स्कॅन करुन ट्रान्सफर करू शकतात. ‘क्यूआर कोड बेस्ड लोकल डेटा ट्रान्सफर’ हे नवीन फिचर आता व्हाट्सअ‍ॅपने लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या जुन्या फोनची चॅट हिस्ट्री तुमच्या नवीन फोनमध्ये सहज ट्रान्सफर करू शकाल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर हे फिचर तुमच्या नक्कीच कामी येईल.

(हेही वाचा – Samriddhi Highway Accident : ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात)

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी शुक्रवार ३० जूनला व्हाट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड डेटा ट्रान्सफर फीचर लाँच केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, “तुम्हाला तुमचे व्हाट्सअ‍ॅप चॅट्स नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर अधिक खाजगी आणि सुरक्षितरित्या हे करू शकता.” झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते मोठ्या मीडिया फाइल्स आणि मीडिया देखील ट्रान्सफर करू शकतात.

क्यूआर कोडद्वारे चॅट ट्रान्सफर करणारे फिचर कसे वापरावे?

सर्वात आधी तुमच्या जुन्या डिव्हाइसवर व्हाट्सअ‍ॅप उघडा आणि सेटिंग्‍ज > चॅट > चॅट ट्रान्सफर वर जा. यानंतर, वापरकर्त्यांना चॅट ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन डिव्हाइसवरुन क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाईल. यासाठी वाय-फाय कनेक्शन आवश्यक आहे. चॅट ट्रान्सफर करण्यासाठी दोन्ही फोन चालू आणि एकाच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केले आहेत का याची खात्री करून घ्या. ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर तुमच्या जुन्या डिव्हाइसवरचे चॅट, मिडीया नवीन डिव्हाइसमध्ये आलेले दिसतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.