Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार ?

117
Arvind Kejriwal यांच्या जामिनावर ७ मे रोजी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे. आज (१५ एप्रिल ) ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिलासा मिळणार ? या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –Indonesia Landslide: इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता)

यापूर्वी याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ईडीकडून करण्यात आलेली अटक आणि रिमांड याविरोधात याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Manu Singhvi) यांनी कोर्टात सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा आधार अशी कागदपत्रे आहेत, ज्यांवर विश्‍वास ठेवता येत नाही. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की, आम्हाला ईमेल करा मग बघू, त्यानंतर ही सुनावणी आज पार पडणार आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –जलद प्रवासाची Modi Guarantee ; वंदे भारत आणि बुलेट ट्रेनचा विस्तार करणार)

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना अटक आणि त्यानंतर तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवण्याबाबत याचिका दाखल केली होती. ९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. वारंवार समन्स पाठवूनही केजरीवाल (Arvind Kejriwal) तपासात सहभागी झाले नाहीत, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) त्यांना अटक करण्याचा एकमेव पर्याय उरला होता. (Arvind Kejriwal)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.