Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने (Congress) राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. या समन्वयकांवर लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे.

175
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने (Congress) राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. या समन्वयकांवर लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. काँग्रेस पक्ष राज्यात इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) माध्यमातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेस (Congress) नेमक्या किती आणि कोणत्या जागा लढविणार हे अद्याप निश्चित नसले तरी काँग्रेसने सर्वच मतदारसंघात आपली संघटनामक ताकद उभी करण्याचे ठरवले आहे. (Lok Sabha Election 2024)

हे असतील समन्वयक

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार मुंबई उत्तरसाठी मधू चव्हाण, मुंबई उत्तर पश्चिमसाठी अस्लम शेख, मुंबई उत्तर पूर्वसाठी बलदेव खोसा, मुंबई उत्तर मध्यसाठी अमीन पटेल, मुंबई दक्षिणमध्यसाठी अशोक जाधव तर मुंबई दक्षिणसाठी वीरेंद्र बक्षी हे समन्वयक असतील. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Indigo Airlines: इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होणार, इंधन शुल्क मागे घेण्याची घोषणा)

यांची समन्वयक म्हणून नेमणूक 

नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी कुणाल पाटील, धुळ्यासाठी नसीम खान, जळगावची यशोमती ठाकूर, रावेरसाठी प्रणिती शिंदे, दिंडोरीसाठी अमीन पटेल, नाशिकची अमित देशमुख, पालघरसाठी सुरेश टावरे, भिवंडीसाठी अनीस अहमद, रायगडसाठी चारुलता टोकस, पुण्यासाठी विश्वजित कदम, मावळसाठी हुसेन दलवाई, अहमदनगरसाठी मोहन जोशी, शिर्डीसाठी बाळासाहेब थोरात, कोल्हापूरची पृथ्वीराज चव्हाण तर सांगलीची सतेज पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.