Indigo Airlines: इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होणार, इंधन शुल्क मागे घेण्याची घोषणा

151
Indigo Airlines: इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होणार, इंधन शुल्क मागे घेण्याची घोषणा
Indigo Airlines: इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होणार, इंधन शुल्क मागे घेण्याची घोषणा

इंडिगो या भारतातल्या अग्रगण्य एअरलाईन्स कंपनीने ४ जानेवारी २०२४पासून इंधन शुल्क मागे घेण्याची घोषणा केली आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रमुख असलेल्या इंडिगो कंपनीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. हा निर्णय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गासाठी घेण्यात आला आहे.

इंडिगोकडून सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, इंडिगो एअरलाइन्सला इंधन अधिभार हटवण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा अधिभार ४ जानेवारी २०२४पासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू झाला आहे. एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एअरलाईन्सकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता सुपरफास्ट; रेल्वे मंत्र्यांनी केले महत्त्वाचे ट्विट )

एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर इंडिगोने गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२३मध्ये इंधन अधिभार लागू केला होता. जेट इंधनच्या वाढत्या किमतींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. एअरलाइन्सच्या प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार हा इंधन अधिभार लागत होता, मात्र आता त्यांची या शुल्कातून सुटका झाली आहे. आता इंधन अधिभार हटवल्यानंतर इंडिगो फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट स्वस्त होऊ शकते.

ऑक्टोबर २०२३मध्ये इंधन अधिभार लागू करताना इंडिगोने सांगितले होते की, विमान प्रवासाच्या अंतरानुसार इंधन शुल्क ३०० ते १००० रुपये निश्चत करण्यात आला आहे. त्यामुळे एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF)च्या किमतींचा थेट परिणाम भाड्यांवर दिसून येतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.