सीमेवरील जवानांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे लष्कर संग्रहालय होणार!

मुंबईत सरकारच्या माध्यमातून चौपदरी समुद्र मार्गाचे काम सुरु आहे. तसेच मराठी नाटक रंगभूमी दालनाचेही काम सुरु आहे. मात्र, त्याबरोबरच मुंबईत लष्कराचे संग्रहालयही बनवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

88

सध्या अनेकांचे देशप्रेम जागे झाले आहे. भारत मातेकी जय… वंदे मातरम…अशा घोषणा दिल्या म्हणजे आपण देशभक्त झाल्याचे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे सीमेवर लढणाऱ्या लष्कारातील जवानांचे जीवन काय असते, हे अनुभवता यावे याकरता मुंबईत लष्कराचे संग्रहालय बनवले जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या दसरा मेळाव्यात केली. यामध्ये जवान ज्या तापमानात आणि कडाक्याच्या थंडीत राहतो, जो गणवेश परिधान करतो, शस्त्र हाताळतो, याचा अनुभव या संग्रहालयात अनुभवता येणार आहे. त्यामुळे जे कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले नाही त्यांनी एकदा या संग्रहालयात जावून जवानांचा अनुभव घ्यावा, असेही आवाहन उद्धव ठाकरे म्हणाले.

जे कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले नाही, त्यांच्यासाठी संग्रहालय!

मुंबईत सरकारच्या माध्यमातून चौपदरी समुद्र मार्गाचे काम सुरु आहे. तसेच मराठी नाटक रंगभूमी दालनाचेही काम सुरु आहे. मात्र, त्याबरोबरच मुंबईत लष्कराचे संग्रहालयही बनवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीमेवर जवान कसा उभा राहतो, कोणत्या वातावरणात उभा राहून तो सामना करत असतो, हे आपल्याला माहित नसते. युध्द आपण कधीही पाहिलेले नाही. त्यामुळे नेमके सीमेवर जवान कोणत्या परिस्थिती राहत असतात? काय असते तिथे? म्हणजे कमी तापमानात किंवा अधिक तापमान असेल तरी ते कोणते कपडे घालून असतात. कमी डिग्री सेल्सियसमध्येही ते कोणता गणवेश घालतात. शस्त्र कशी हाताळतात हे व्हर्च्युअल बघता येणार आहे. रणगाडे कसे चालवतात हे पाहता येणार आहे. त्यामुळे भारतमाता की जय बोलणाऱ्यांना उत्तर देण्यासाठीच हे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला असून जे कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले नाही आणि त्यांनी किमान या संग्रहालयात जावून तरी सीमेवरील जवानांचे जीवन अनुभवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

(हेही वाचा : मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.