Amit Shah : भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू

115
Amit Shah : भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू

तेलंगणात भाजपला बहुमत मिळाले तर मुस्लिम धर्मियांचे 4 टक्के आरक्षण रद्द केले जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली आहे. तेलंगणातील जानगाव येथे आयोजित रॅलीत ते बोलत होते.

याप्रसंगी अमित शहा म्हणाले की,

“भाजपला सत्ता मिळाल्यास तेलंगणातील 4 टक्के मुस्लिम आरक्षण रद्द करण्यात येईल. केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे मुस्लिम आरक्षण (Amit Shah) देण्यात आले आहे. तेलंगणाच्या आगामी विधानसभा निवडणुका देशाचे भवितव्य ठरवतील. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथील जनतेला अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन मोफत देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी केले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde भल्या पहाटेच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर; आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार)

अमित शहांनी (Amit Shah) भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील केसीआर सरकारमधील भ्रष्टाचारावर हल्ला केला आणि त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल, असेही सांगितले. ज्याने भ्रष्टाचार केला असेल तो तुरुंगात जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

केंद्र सरकारचे कौतुक करताना अमित शहा म्हणाले की,

पंतप्रधान मोदींच्या (Amit Shah) नेतृत्वाखाली भारताने झपाट्याने प्रगती केली आहे. ओवेसींच्या भीतीने केसीआर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा करत नाहीत. केसीआर यांनी दिलेले वचन मोडल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात ते काम करत आहेत. त्यांचे आमदार फक्त जमिनीवर कब्जा करतात. भाजप घराणेशाही करत नाही, मात्र येथील तिन्ही पक्षांमध्ये घराणेशाही शिगेला पोहोचली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

(हेही वाचा – Mumbai Metro: मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात, डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल)

तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.