Mumbai Metro: मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात, डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३चे काम सुरू आहे.

12
Mumbai Metro: मेट्रो ३'चे काम अंतिम टप्प्यात, डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल
Mumbai Metro: मेट्रो ३'चे काम अंतिम टप्प्यात, डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. यापैकी कुलाबा ते सिप्झदरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उद्दिष्ट आहे. (Mumbai Metro)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३चे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेची इतर कामे सुरू आहेत. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मेट्रो प्रशासनाने ठरवले आहे, तर या मार्गावर मेट्रोची रात्रीच्या वेळेस ट्रायल रनदेखील घेण्यात येत आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: अल-शिफानंतर इस्रायलचे ‘हे’ आहे लक्ष्य, वाचा सविस्तर )

कुलाबा ते सिप्झदरम्यान धावणाऱ्या मेट्रो ३चे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेडदरम्यान करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्क्यांहून जास्त आणि दुसऱ्या टप्प्यातील काम ८० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.

प्रकल्पासाठी २३,१३६ कोटी खर्च होणार
पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२३, तर दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी २३,१३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.