Amit Shah: विदर्भातील ६ लोकसभेचा आढावा, उमेदवारांबाबत चाचपणी; लाभार्थ्यांसह सर्व घटकांना एकत्रित करण्याचे आवाहन

विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, अकोला व बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संचलन समिती सदस्य व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

73
Amit Shah: विदर्भातील ६ लोकसभेचा आढावा, उमेदवारांबाबत चाचपणी; लाभार्थ्यांसह सर्व घटकांना एकत्रित करण्याचे आवाहन
Amit Shah: विदर्भातील ६ लोकसभेचा आढावा, उमेदवारांबाबत चाचपणी; लाभार्थ्यांसह सर्व घटकांना एकत्रित करण्याचे आवाहन

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर येथील बैठक संपल्यांनतर शाहा दुपारी अकोल्यात गेले. या ठिकाणी त्यांनी विदर्भातील ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला व संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी केली. चार पिढ्यांनी केलेल्या संघर्षानंतर भाजपाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे समाजाचे काम करण्याची आपल्याला संधी आहे. लाभार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन अमित शहा यांनी बैठकीत केले.

विमानतळावर शहांचे जंगी स्वागत
अमित शहा यांचे दुपारी 12.30 वाजता अकोला शिवणी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर बुथ कमिट्यांचे पदाधिकारी, आमदार रणधीर सावरकर, अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहा यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस होते. त्यानंतर अशोक वाटिका चौक, लक्झरी बस स्टँड चौक, वाशिम बायपास चौकासह शहरातील ८ ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणेने भाजप कार्यकर्तांनी त्यांचे स्वागत केले.

विदर्भातील या लोकसभेचा घेतला आढावा
दुपारी 12.45 वाजता त्यांचे हॉटेल ग्रॅड जलसा येथे बैठक स्थळी आगमन झाले. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, अकोला व बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संचलन समिती सदस्य व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडून येणारा व जनाधार असलेला कोण उमेदवार योग्य राहील याबाबत त्यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सहा जिल्ह्यातिल भाजपचे आमदार उपस्थित होते. अकोल्यातील बैठकीनंतर ते जळगाव येथील सभेसाठी रवाना होणार आहेत.

सर्व घटकांना एकत्रित करण्याचे आवाहन
अमित शहा म्हणाले की, भाजपला जनतेच्या मनातला लोकनेता अभिप्रेत नेता प्राप्त झाला आहे. प्रत्येक वार्डात प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता प्राप्त असल्यामुळे भाजपाचा हा विजयाचा मंत्र असून आधार आहे. भाजप 2024 ची निवडणूक ही जिंकणारच आहे. परंतु भारतीय जनता पक्ष 25 वर्षाचे लक्ष घेऊन पक्षाच्या चार पिढीने केलेल्या संघर्ष त्या तपस्या बलिदान याला नमन करून त्यांनी अनेक कष्ट सहन करून पक्ष विस्तारासाठी विपरीत परिस्थिती काम केले आता सध्या चांगली परिस्थिती असताना येणाऱ्या पिढीला अजून चांगलं काम करता यावं यासाठी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पक्षाने आपल्याला दिलेली जबाबदारी 40 दिवस यशस्वीरीत्या पार पाडा. लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम करा, असेही अमित शहा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.