महायुतीचे सर्व पक्ष एकमेकांचा प्रचार करतील – चंद्रशेखर बावनकुळे

103
महायुतीचे सर्व पक्ष एकमेकांचा प्रचार करतील - चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात एकत्र सहभागी होतील. त्यामुळे ते एकमेकांचा प्रचार करतील. याचा कोणताही विपर्यास काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने याची दखल घेतली आहे. संभाजी भिडे हे भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य नाहीत त्यामुळे यांचा भाजपाशी संबंध जोडणे योग्य होणार नाही. सरकारकडून कार्यवाहीची वाट पहावी. कॉंग्रेसने केवळ भाजपाला टार्गेट करणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Samruddhi Mahamarg Accident : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेब हे नॉन पॉलिटिकल कार्यक्रमात एकत्र येत आहेत. त्याचे राजकारण करणे योग्य नाही, असा टोला विरोधकांवर त्यांनी लगावला. राज्य सरकारच्या वतीने सर्व नुकसानग्रस्तांची चौकशी केली जात आहे. ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या प्रमाणात भरपाई मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.