अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत यांची भविष्यवाणी

191
सांगलीतील UBT उमेदवाराची घोषणा राहुल गांधींच्या सहमतीनेच; संजय राऊत काय म्हणाले ?

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. काल म्हणजेच रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांना नक्की किती आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे हे अजून समोर आले नाही.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादीमध्ये गळती सुरूच; आणखी एक बडा नेता अजितदादांच्या गळाला)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

बुलढाण्यात (Buldhana Accident News) चिता जळत असताना शपथविधी पार पडला. त्यांना एक दिवस थांबता आलं असतं. इतकं निर्घृण राजकारण कधीच पाहिलं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर बोचरी टीका केली आहे. बुलढाण्यातील अपघातात बारामतीतील तीन जणांचा मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील प्रवाशांचाही समावेश होता. मृतदेहांची ओळख पटत नाहीये, नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे आणि २४ तास या दुर्घटनेला होत नाही, तोच राजभवनामध्ये हे सर्वजण पेढे वाटत होते, फटाके फोडत होते. महाराष्ट्रात लवकरच मुख्यमंत्री बदलणार आहेत. महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हटवून त्यांना आणि त्यांच्या १६ आमदारांना अपात्र ठरवलं जाईल.

राऊत पुढे म्हणाले की, “अजित पवारांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. पण यंदा मात्र त्यांचं डील जे आहे ते मुख्यमंत्रीपदासाठी आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र १०० टक्के ठरणार आहेत. दिल्लीतली त्यांची जी महाशक्ती आहे, त्यांनाही हे कळून चुकलंय आपण त्यांना वाचवू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावीच लागेल. ऑगस्ट १० तारखेपर्यंत हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. त्यामुळे पुढली व्यवस्था भाजपनं करून ठेवली आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद देऊन ती जागा भरुन काढण्याचं काम काल झालं आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.