Ajit Pawar : महाविकास आघाडीतही मोठा भाऊ – छोटा भाऊ वाद सुरू; काय म्हणतात अजित पवार? 

आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल.

181

भाजप-शिवसेना युतीमध्ये जेव्हा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या तेव्हा युतीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा वाद सुरु झाला होता, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला, ज्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली. आज आता हा वाद महाविकास आघाडीमध्ये सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण महाविकास आघाडीत मोठा भाऊ झालो आहोत असा दावा करत लोकसभा निवडणुकीच्या आधीच जागा वाटपाच्या संदर्भात बोलले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत या विषयावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि आमच्या ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितले आहे.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिर पाडून बांधलेली मशीद; मराठ्यांनी केला जीर्णोद्धार; नाशिकच्या ज्योतिर्लिंगाचा काय आहे इतिहास?)

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

सगळ्यांची डीएनए टेस्ट करू. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित पवार काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येक जण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरते हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.