Demonetisation : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही – एसबीआय

RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

20
Demonetisation : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही - एसबीआय

शुक्रवार १९ मे २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Demonetisation) एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाजारातून आता दोन हजाराच्या नोटा बंद (Demonetisation) होणार आहेत. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या दोन हजाराच्या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत. मात्र या निर्णयामुळे नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहे.

(हेही वाचा – बुद्धीमत्तेच्या जोरावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले नाव)

नक्की कशा प्रकारे या नोटा (Demonetisation) बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. अशातच यासंदर्भातली नियमावली वेळोवेळी बँकांकडून जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन बँकेकडून करण्यात येत आहे. तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी (Demonetisation) कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं देखील एसबीआयनं सांगितलं आहे.

एसबीआयकडून (Demonetisation) आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. स्टेट बॅंकेसोबतच इतर बँक देखील या नियमाचे पालन करतील अशी माहिती आता मिळत आहे.

हेही पहा – 

आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले पर्याय

1. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरीक 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

2. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.

3. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

5. 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

6. आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

7. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.