बुद्धीमत्तेच्या जोरावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले नाव

18
बुद्धीमत्तेच्या जोरावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवले नाव
बुद्धीमत्तेच्या जोरावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवले नाव

“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” ही म्हण सार्थक ठरली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील चिमुकला नर्सरीमध्ये शिकणारा हा अवघ्या साडेतीन वर्षांचा असून यांनी मात्र ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदविले आहे. साडे तीन वर्षाचा मुलं कसेबसे बोलायला लागतात… चालायला लागतात…. अ.. आ.. इ.. ई आणि ए.. बी.. सी …डी.. चे धडे गिरवतात…. प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये प्रवेश मिळवून ते शाळेत जायला लागतात….. मात्र साडेतीन वर्षातच अनुदीप या चिमुकल्याने अनेक गोष्टी लक्षात ठेवून आपल्या बुद्धिमत्तेमुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव नोंदविले आहे. या चिमुकल्याने आपल्या आई-वडिलांची मान उंचावली असून त्याचे कौतुक सगळीकडेच होत आहे.

अनुदीप अंकुश चव्हाण अवघ्या साडेतीन वर्षांचा नर्सरीमध्ये शिकणारा, वडिलांचे मूळ गाव नांदेड जिल्हातील माहूरगड जवळील आमनाडा. वडील बुलढाणा अर्बन बँकेचे गोरेगाव शाखा व्यवथापक आई गृहिणी, अनुदीप जेमतेम नर्सरी मध्ये प्रवेश घेऊन शाळेत जायला लागला. वयाच्या दुसऱ्या वर्षी ए ..बी…सी… डी आणि अ… आ.. ई… चे धडे गिरवत हा पुढे चालत होता. मात्र त्याची लक्षात ठेवण्याची क्षमता मोठी होती.

(हेही वाचा – शिक्षकाने दोन लाखांत बनवला ‘शिकवणारा रोबोट’)

जेव्हा अनुदीप नर्सरीमध्ये जायला लागला तर इंग्रजी शब्द, स्पेलिंग लक्षात ठेवण्याची क्षमता आणि गुणांची ओळख आई-वडिलांना आणि शिक्षकांना झाली. आणि यातूनच त्याचा प्रवास पुढे वाढत चालत गेला. आज अनुदीप विविध प्रकारच्या जनरल नॉलेज विषयी माहिती सांगतो. देशपातळीवरील राज्य आणि राजधान्या, देशाचे प्रमुख कोण आहेत याच्या विषयी तोंडपाठ माहिती सांगतो. आंतरराष्ट्रीय देशांच्या राजधान्या विषयी माहिती सांगतो, एबीसीडी तसेच नावे स्पेलिंग सहीत सांगतो, एक ते शंभरपर्यंत तोंडपाठ म्हणतो, अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. अवघ्या साडे तीन वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या या कर्तव्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि ही गोंदिया जिल्हा करिता फार गौरवाची बाब आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.