‘एक मिनिट असं बोलायचं नाही’, अजित पवारांनी पदाधिका-याला सुनावले

113

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. अजित पवार हे सध्या चंद्रपूर दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी एका पदाधिका-याला आपल्या शैलीत खडे बोल सुनावले आहेत. तेव्हा अजित पवार यांच्या फटकळ स्वभावाचा अनुभव सगळ्यांना आला.

काय झाले नेमके?

खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक जयस्वाल यांना पवारांनी आपल्या गाडीत बसायला सांगितले होते. त्यानंतर पवार हे हे इतर कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी बोलण्यात व्यस्त झाले. त्यानंतर जयस्वाल हे गाडीतून उतरले आणि त्यांनी बाहेर येऊन अजित पवार यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. तेव्हा, ‘तुला गाडीत बसायला सांगितले होते ना’, असे अजित पवारांनी जयस्वाल यांना सांगितले.

पवारांनी सुनावले

‘मी गाडीतच बसलो होतो पण तुमचं लक्ष नाही माझ्याकडे’, अशी तक्रार जयस्वाल यांनी यावेळी केली. तेव्हा अजित पवार यांनी जयस्वाल यांना सुनावले. ‘एक मिनिट असं बोलायचं नाही, मी सगळ्यांशी बोलतोय’, असे अजित पवार यांनी चढ्या स्वरात खडे बोल सुनावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.