Maratha Reservation : ……अन् दादांच्या आमदारांना कानपिचक्या

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असताना आमदार खासदार आपल्या पदाचे राजीनामा देत असतानाच आता तीन आमदारांनी मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.

80
Maratha Reservation : ......अन् दादांच्या आमदारांना कानपिचक्या
Maratha Reservation : ......अन् दादांच्या आमदारांना कानपिचक्या

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असताना आमदार खासदार आपल्या पदाचे राजीनामा देत असतानाच आता तीन आमदारांनी मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. राजकीय नेत्यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने त्यांनाही उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. (Maratha Reservation)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवस आजारी असल्याने व डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते गेली काही दिवस घरीच आराम करत आहेत. मात्र असे जरी असले तरी घरूनच ते सध्या महाराष्ट्रात व प्रामुख्याने मराठवाड्यात मराठा आंदोलकांनी जो हिंसक पावित्रा घेतला आहे त्याच्यासह सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती ते घरूनच घेत आहेत. त्यातच याच हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याने मुंबईतल्या पोलिस यंत्रणेही अलर्ट मोडवर जात मंत्रालयच्या अवती भोवती एक मोठे कडे केले होते. (Maratha Reservation)

अशावेळी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार राजू नवघरेंनी मंत्रालयाच्या शेजारील गांधी पुतळ्यासमोर ठिय्या देत उपोषणाला सुरुवात केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांकडून लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ७ वा दिवस आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याआधी मराठा आरक्षण प्रश्नावर आता पर्यंत दोन खासदार आणि दोन आमदारांनी आता पर्यंत राजीनामे देऊ केले आहेत. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Sunil Tatkare : आता राजकारण करायची ही वेळ नाही, विरोधकांना सुनावले खडे बोल)

उपोषणाची गंभीर दखल

मराठा आंदोलनाचा फटका काही प्रमाणात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना होत असताना व अजित पवार गट सत्तेत सहभागी असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच ते ही दादा गटाच्या याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी आपल्या गटाच्या सर्व आमदार व मंत्र्यांची संध्याकाळी तातडीची बैठक बोलावून सर्वांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. “अरे राज्यात आपण सरकार मध्ये सहभागी असताना आपल्याच सरकार विरोधात आपणच उपोषण कसे काय करु शकतो. मराठा आरक्षण प्रश्र्नी स्वतः मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिकपणे काम करत असताना तूम्ही आंदोलकांना सरकारची भूमिका समजावून सांगण्यापेक्षा तुम्हीच उपोषणाला बसून काय संदेश पाठऊ पाहत आहात” अशा खरमरीत शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती त्यांच्याच गटाच्या विश्वसनीय अंतर्गत सूत्रांनी दिली. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.