पत्रकार परिषदेत कृषिमंत्री Manikrao Kokate आक्रमक; म्हणाले, मी कोणाचा विनयभंग केला नाही

168
Manikrao Kokate यांचे 'लाल दिवा' स्वप्न भंगणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ!

मागील दोन दिवसांपासून व्हायरल झालेल्या ‘रमी गेम’ व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या गदारोळानंतर आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा स्फोटक खुलासा केला. राजीनामा देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना, कोकाटेंनी आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शेतकरी कल्याण योजना’ची घोषणा केली.

पण, पत्रकारांनी रमी गेमबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी सडेतोड उत्तर देत विरोधकांना आव्हान दिले. कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले,“मी आत्तापर्यंत ५२ नवीन जीआर काढले, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो, कृषी विद्यापीठात जाऊन नवे उपाय शोधले. पण या कामाची कुठेच प्रसिद्धी नाही. माझ्या चुकीच्या वर्तणुकीवर मात्र लगेच टीका होते.”

(हेही वाचा – Tesla cost in India : भारतात टेस्ला या कारची किंमत किती आहे आणि का?)

रमी गेमवर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले.

“सभागृहात मी काम करत होतो. ओएसडीकडून माहिती हवी म्हणून मोबाईल मागवला. मोबाईल उघडल्यावर गेमचा पॉप-अप आला. नवा मोबाईल असल्याने स्कीप करायला वेळ लागला. व्हिडिओ ११ सेकंदांचा आहे, पण मी गेम स्कीप केल्याचा भाग दाखवला नाही.”

राजीनाम्याबाबत त्यांनी मोठं विधान केलं.

“मी दोषी सापडलो, तर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री निवेदन करावे. त्या दिवशी त्यांना न भेटता मी थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करीन.” त्यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. “मी राजीनामा देण्यासारखं काय केलं? मी कोणाचा विनयभंग केला नाही, चोरी केली नाही, माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. एक फोटो काढून विरोधकांनी राजकारण केलं. मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.”

सीडीआर चौकशीची मागणी

कोकाटे म्हणाले, “व्हिडिओ काढणाऱ्याचे CDR तपासा, सूत्रधार कोण हे शोधा. मी काही वेडवाकडं केलं नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहीन. ”या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, विरोधक पुढे काय पाऊल उचलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.