वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पंकजा मुंडेंसह २१ संचालक विजयी

144
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पंकजा मुंडेंसह २१ संचालक विजयी
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पंकजा मुंडेंसह २१ संचालक विजयी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नावे गुरुवारी जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व आमदार धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

कारखान्याचे हित महत्वाचे म्हणूनच बिनविरोध निवडीचा निर्णय

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टातून आणि मेहनतीने वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या या परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचे हित पाहणे महत्वाचे होते म्हणून आम्ही व आमदार धनंजय मुंडे यांनी मिळून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचे सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.

‘हे’ संचालक बिनविरोध विजयी

पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे…

पांगरी गट – श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे

नाथरा गट – सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे परळी गट – पांडूरंग फड, हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक, सिरसाळा गट – सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड,

धर्मापूरी गट – शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे

सहकारी संस्था मतदारसंघ – सत्यभामा उत्तमराव आघाव

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – मंचक घोबाळे

महिला प्रतिनिधी – पंकजा मुंडे, ॲड. यशश्री मुंडे

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – केशव माळी, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी – वाल्मिक कराड

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.