संजय राऊतांची ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत CBI कडे तक्रार! पंतप्रधान-ईडीला केले टॅग

भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात राऊतांनी ही तक्रार केली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला यात टॅग केले आहे.

158
संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी CBI कडे तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात राऊतांनी ही तक्रार केली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला यात टॅग केले आहे. राज्यातील गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. तसेच या कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

( हेही वाचा : दिवसभर Instagram अ‍ॅपवर रिल्स बघताय? सावधान!  )

संजय राऊत यांनी केली तक्रार 

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु त्यांनी सातत्याने डोळेझाक केल्याने मी आता सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघूया पुढे काय होते असे संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग केले आहे. तसेच दोन पानाचे पत्रही शेअर केले आहे.

( हेही वाचा : fake gold loan scam : नकलीला ठरवले असली; आपल्याच व्यक्तीकडून बॅंक फसली)

संजय राऊतांनी याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार केली होती. याबाबतचे पत्र त्यांनी फडणवीसांना दिले होते. आपल्या तक्रारीत त्यांनी थेट राहुल कुल यांचे नाव घेतले आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे १८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचे प्रकरण सीबीआयकडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते, म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहेत. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडे लक्ष देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.