दिवसभर Instagram अ‍ॅपवर रिल्स बघताय? सावधान!

आपला दिवसातील किती वेळ या सोशल मीडियामुळे वाया जातो आहे, याची स्पष्ट माहिती मिळाली तर रिल्सचे व्यसन सहज सोडता येईल.

177

लॉकडाउन नंतरच्या कालावधीत सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जगातील तब्बल दोन अब्ज युजर्स प्रत्येक दिवशी Instagram या अ‍ॅपचा वापर करतात. इतर देशांच्या तुलनेत भारतातील युजर्सची संख्या सर्वात जास्त आहे. इतकेच नाही तर देशातील जवळपास २३ कोटी युजर्स रिल्स बनवतात. नियमितपणे तासनतास बसून रिल्स बघून शारिरीक, मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

( हेही वाचा : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली)

Instagram रिल्स बघताय? दुष्परिणामांसाठी तयार रहा!

  • १८ ते २४ वयोगटातील जे तरुण सोशल मीडियाचा जास्त वापर करतात, त्यांच्यांत सी – रिअॅक्टिव प्रोटिनचे प्रमाण जास्त असते. या घटकामुळे मधुमेह, कर्करोग, रक्तवाहिन्यांसंबधी रोग होण्याची शक्यता असते.
  • १२ ते १५ वयोगटातील वर्षातील मुलांच्या मेंदूवर रिल्सचा नकारात्मक परिणाम होतो. या मुलांमधली एकाग्रता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
  • संशोधनातून हे समोर आले आहे, की सतत खाण्यासंबंधी रिल्स पाहण्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो.
  • चिंता, नैराश्य आणि एकाकीपणा दिवसेंदिवस वाढत जातो.
  • सतत दिसणाऱ्या जाहिरातींमुळे गरज नसलेल्या गोष्टी विकत घेण्याचे प्रमाण वाढते.

( हेही वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! खासगी बस उलटली, १० प्रवासी गंभीर)

अशाप्रकारे घ्या काळजी…

  • सोशल मीडिया अ‍ॅपवर फोटो, व्हिडिओ शेअर करणे हळूहळू कमी करा. एखाद्या अ‍ॅपवर जर व्यक्तिगत फोटो, व्हिडिओ शेअर करणे कमी केले तर त्या अ‍ॅपवरचा वेळ कमी होईल.
  • सोशल मीडिया अ‍ॅपची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे, की युजर्सना हे अ‍ॅप बंद करून बाहेर जायची इच्छा होऊ नये. अ‍ॅप्सचा वापर अचानक थांबवणे शक्य नसेल, तर दिवसातून किती मिनिटे हा अ‍ॅप वापर करायचा हे निश्चित करा.

Instagram Reels

  • आपला दिवसातील किती वेळ या सोशल मीडियामुळे वाया जातो आहे, याची स्पष्ट माहिती मिळाली तर रिल्सचे व्यसन सहज सोडता येईल. प्ले स्टोअरवर अनेक सोशल मीडिया मॉनिटरींग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्या अ‍ॅपच्या सहाय्याने हे समजेल, की दररोज किती वेळ एखाद्या अ‍ॅपचा वापर तुम्ही करताय किंवा अगदी Instagram वर सुद्धा याची माहिती मिळते. इतकेच नाहीतर एखादे अ‍ॅप किती वेळा ओपन केले आहे हे सुद्धा याद्वारे समजते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.