ऐकावे ते नवलच! साप पाळून कोट्याधीश झालेत ‘या’ गावचे लोक

154

पूर्वी भारताची ओळख सापांचे खेळ करणारा देश अशी होती. परदेशी लोक आपल्याला मागासलेले समजत. परंतु आपण आपल्या कर्तृत्वाने जगाचं तोंड बंद केलं. मात्र आता एका गावातले लोक साप पाळून श्रीमंत होत आहेत. सापाचं पालन करुन इथले लोक लाखो रुपये कमावतात. तर जाणून घेऊया अशाच एका गावाबद्दल…

सापांची शेती

चीनमध्ये लोक साप पाळण्याचा व्यवसाय करतात. ज्याप्रमाणे कुक्कुटपालन, मत्स्य पालन इ. व्यवसाय केला जातो. त्याच प्रकारे चीनमध्ये साप पाळले जातात. चीनमध्ये याला सापाची शेती असे म्हणतात. आश्चर्याचा धक्का बसला ना? परंतु हे सत्य आहे. सापांचे विष लाखो-करोडो रुपयांत विकले जाते म्हणूनच चीनमध्ये लोक साप पाळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर देशांमध्ये साप पाळणे बेकायदेशीर आहे. मात्र चीनमध्ये हा मोठा व्यवसाय आहे.

( हेही वाचा: Income Tax: आनंदाची बातमी! आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही कर? )

साप पाळून कोट्यधीश झालेलं Zisiqiao गाव

Zisiqiao नावाचं चीनमधील एक छोटसं गाव, हे गाव सापांच्या शेतीसाठी ओळखलं जातं. या गावातून अनेक ठिकाणी विष नेलं जातं. दरवर्षी केवळ सापांच्या शेतीतून या गावाला कोट्यवधी रुपये मिळतात. सुमारे १२ दशलक्ष डॉलर म्हणजे १०० कोटी रुपयांचा व्यवसाय हे गाव करतं. म्हणजे या गावातले लोक श्रीमंत आहेत.

साप पालन करण्याच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक कारणांसाठी विविध सापांच्या प्रजातींचे संगोपन केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला हा व्यवसाय करण्याची जोखीम घेता येत असेल तर तो त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. साप पाळण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे आणि जागतिक विषाच्या बाजारपेठेत सापाच्या विषाची मागणी वाढत असल्याने साप पालन करण्याच्या व्यवसायाला खूप मागणी आहे. म्हणूनच या गावातील लोकांनी निर्माण केलेल्या सापाच्या विषाला अधिक मागणी आहे. चीनमधलं Zisiqiao नावाचं हे आगळवेगळं गाव साप पाळून श्रीमंत झालं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.