Women Health Care : मासिक पाळी नियमित करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

दर महिन्याला मासिक पाळी न येण्यामागे अमेनोरिया हेदेखील कारण असू शकते. मेघा रंजन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा महिलांना नियमित मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्याला वैद्यकीयदृष्ट्या अमेनोरिया म्हणतात. (Women Health Care)

168
Women Health Care : मासिक पाळी नियमित करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Women Health Care : मासिक पाळी नियमित करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. (Women Health Care) मासिक पाळी नियमित येणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. मासिक पाळी साधारणपणे २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असते. त्याचा कालावधीही दोन ते सात दिवसांचा असतो. वैज्ञानिकदृष्ट्या ही महिलांच्या शरीरातील हार्मोनल प्रक्रिया आहे. पौगंडावस्थेपासून विशिष्ट वयापर्यंत मासिक पाळी सुरू राहते. पण अशा अनेक महिला आहेत, ज्यांची मासिक पाळी नियमित येत नाही. अनियमित मासिक पाळी ही एक मोठी समस्या आहे. दर महिन्याला मासिक पाळी न येण्यामागे अमेनोरिया हेदेखील कारण असू शकते. मेघा रंजन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा महिलांना नियमित मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्याला वैद्यकीयदृष्ट्या अमेनोरिया म्हणतात. (Women Health Care)

(हेही वाचा – कोबी शोशानी यांच्या सावरकर स्मारकातील शस्त्रपूजनाच्या पोस्टला २४ तासांत सव्वादोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज)

अमेनोरियाची लक्षणे

डोकेदुखी,  दृष्टीत बदल होणे, मळमळ, चेहऱ्यावर जास्त लव असणे, केस गळणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, स्तनातून स्त्राव येणे ही अमेनोरियाची महत्त्वाची लक्षणे आहेत. मासिक पाळी नियमित येत नसेल, तर त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. कारण यामुळे शारीरिक बदलही होतात. (Women Health Care)

उपचार

मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक मुलींना अनियमित मासिक पाळी येते. मग काय उपचार करावेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कि नाही, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतात. महिलांमधील या समस्येवर उपचार म्हणून तज्ज्ञांनी रक्त तपासणी सुचवली आहे. थायरॉइड फंक्शन, डिम्बग्रंथि कार्य, टेस्टोस्टेरॉन (पुरुष संप्रेरक) या चाचण्या पीसीओएस, एस्ट्रोजेन पातळी (महिला संप्रेरक) दर्शवू शकतात. (Women Health Care)

जीवनशैली बदलणे आवश्यक आहे

डॉक्टरांच्या मते, महिलांना अमेनोरियापासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यांची जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. आहार, शारीरिक हालचाली, ताणतणाव या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही औषधांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता. हार्मोन्समधील बदल हार्मोन थेरपीने नियंत्रित केले जाऊ शकतात. अशा आजारामध्ये शस्त्रक्रिया दुर्मिळ आहे. मात्र जर समस्या अधिक गंभीर असेल, तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. (Women Health Care)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.