Cardamom Milk : वेलचीच्या दुधाचा समावेश मुलांच्या आहारात केल्याने होतील ‘हे’ फायदे

वेलचीचे दूध बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही वेलचीच्या काही बिया गरम किंवा थंड दुधात मिसळून त्याचे सेवन करू शकता. हे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

118
Cardamom Milk : वेलचीच्या दुधाचा समावेश मुलांच्या आहारात केल्याने होतील 'हे' फायदे
Cardamom Milk : वेलचीच्या दुधाचा समावेश मुलांच्या आहारात केल्याने होतील 'हे' फायदे

वेलची दिसायला छोटी असली, तरी तिचे फायदे खूप जास्त आहेत. (Cardamom Milk) होय, वेलचीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म आढळतात. अशातच वेलचीचा वापर दुधासोबत केला, तर त्याचे आणखी फायदे मिळतात. जे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आज आम्ही आजच्या या लेखात तुम्हाला वेलचीचे दूध पिण्याचे फायदे सांगणार आहोत. ते तुमच्या लहान मुलांसाठी किती फायदेशीर आहे, ते देखील सांगणार आहोत. (Cardamom Milk)

(हेही वाचा – Akhilesh Yadav : अखिलेश यादव देशाचे भावी पंतप्रधान; सपा मुख्यालयातील होर्डिंग काँग्रेसच्या जिव्हारी)

वेलचीचे दूध बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही वेलचीच्या काही बिया गरम किंवा थंड दुधात मिसळून त्याचे सेवन करू शकता. हे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

१. वेलचीमध्ये पाचक घटक असतात. यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते. वेलची आणि मध मिसळलेले दूध बाळाला द्यावे. यामुळे पचनशक्ती वाढेल आणि मुलाला भूक लागेल.

२. मुलांना अनेकदा जुलाब, उलट्या, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी मुलाला वेलचीचे दूध प्यायला लावा. वेलचीचे दूध मुलाला खाऊ घातल्यास पोटाला थंडावा मिळेल.

३. वेलचीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. वेलचीचे दूध प्यायल्याने मुलांच्या शरीरात ऊर्जा वाढते. लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात साखर मिठाई, बडीशेप आणि वेलची मिसळून त्यांना खायला द्यावे. यामुळे डोळे निरोगी राहतील आणि शरीराला ताकद मिळेल. (Cardamom Milk)

४. एका अभ्यासानुसार, लहान मुलाला वेलचीचे दूध पाजल्यास लठ्ठपणाची समस्या दूर होते. कोमट दुधात वेलची घालून ते प्यायल्याने चरबी जमा होण्यापासून बचाव होतो. वेलचीसोबत दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवता येते. वेलचीसोबत दुधाचे सेवन केल्याने यकृताचे कार्यही सुधारते.

५. वेलचीचे दूध पाजल्याने लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते. वेलची आणि दुधाच्या मिश्रणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेलचीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आढळतो, ज्यामुळे मुलांना बॅक्टेरियाचे संक्रमण टाळण्यास देखील मदत होते. (Cardamom Milk)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.