Whatsappचे नवे फिचर; ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट…

13

Whatsapp मधून ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉलिंग अशा वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेता येत आहे, पण आता सगळ्यांना ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ या नव्या फिचरचासुद्धा अनुभव घेता येणार आहे. मेटाने (Meta) ‘ग्रुप व्हॉईस चॅट’“Voice Chat With Large Group” लाँच केला आहे. या फिचरमध्ये तुम्ही ग्रुपमधल्या सदस्यांशी लाईव्ह संवाद साधू शकता. तसेच या ग्रुप व्हॉईस चॅटमध्ये ३३ ते १२८ जण एकत्र संवाद साधू शकतात.

व्हाट्सॲपच्या (Whatsapp ) अधिकृत एक्स (ट्विटर) वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मेटा मालकीचे मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ ग्रुप संवादासाठी सोईस्कर ग्रुप व्हॉईस चॅट फिचर लाँच करण्यासाठी तयार आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. ‘व्हॉईस मेसेज’ हा फिचर आधीपासून होताच, पण “ग्रुप व्हॉईस चॅट” फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी आवाजाच्या मदतीने लाईव्ह संवाद साधू शकणार आहात.

(हेही वाचा Muslim : श्री कानिफनाथ मंदिरात पुजारी-भाविकांना मारहाण करणे धर्मांधांची ‘मोगलाई’च; मास्टरमाइंड शोधा)

ग्रुप वॉईज चॅट कसे कराल?

  • ज्या ग्रुपबरोबर तुम्हाला ‘व्हॉईस चॅट’ करायचे आहे, तो ग्रुप ओपन करा.
  • त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक वेव आयकॉन दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा.
  • मग ‘व्हॉईसचॅट’ यावर क्लिक करा. त्यानंतर ग्रुप वॉईज चॅट सुरू होईल.
  • तसेच व्हॉईस चॅटमधून बाहेर पडण्यासाठी एक्सवर (X) क्लिक करा
    यात ३२ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात.
  • ग्रुप व्हॉईस चॅट फिचर प्रत्येक ग्रुपसाठी शक्य असणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.