उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बहरली पर्यटन स्थळे

103

उन्हाळी सुट्ट्या म्हटल्या की कुठे ना कुठे फिरायला जायचा प्लॅन बनतोच आणि त्यामुळेच या उन्हाळ्यात समुद्र किनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे व निसर्ग सौंदर्य यामुळे जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. त्यामुळे सध्या ही स्थळे गजबजताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. पुणे -मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत.

या पर्यटन स्थळांना पसंती

अलिबाग- नागाव, वर्सोली, मुरुड-काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. येथे विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र परिचित आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यात गारवा घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. उष्णता अधिक असल्याने रायगड किल्ल्यावर पर्यटक कमी प्रमाणात येत आहेत.

( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

…म्हणून पर्यटक वळले पर्यटन स्थळांकडे 

समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरण जवळील घारापुरी/ अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महिनाभरात येथील नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या दोन वर्षे कोरोनामुळे या सुट्ट्यांच्या हंगाम बेरंग झाला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी होत असल्याने आणि लसीकरणाचीही जोड असल्याने सध्या पर्यटनाकड वळले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.